Saturday 17 September 2016

तु.......


खिडकीशी हसली चाहूल जराशी
तुझ्या येण्याचा जणू भास झाला 
 
वाऱ्यानेच केली फसवणूक पुन्हा 
हा उंबरा तर केव्हाचाच तुला अनोळखी झाला 


सोनाली गाढवे देशमुखदि१७ सप्टेंबर २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख



दोघ..


खूप साऱ्या स्वप्नांची गर्दी कधीच नव्हती 
चल एकाच स्वप्नाला दोघ कुरवाळून पाहू 

ओसरीच्या कंदीलाच जगणं माझं 
चल एकाच अंगणातलं दोघ चांदणं होऊ 


-
सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१६ 

© सोनाली गाढवे देशमुख



.........बाकी आहे


तुझ्या माझ्या आठवांचे 
जाहले कि कोळसे 
अजून कशाची व्हायची 
राख बाकी आहे 

तू परतल्या मार्गावरून 
फिरुनी ना पाहिले 
सुकलेल्या पाचोळ्याची मात्र 
साथ बाकी आहे 

भरजरी स्वप्नांची लत्करे 
होऊन गेली 
दरिद्री चांदण्याची अजूनही 
रात बाकी आहे 

तू सजवलेल्या भिंतींचा 
रंग केव्हाच विटला 
ओसाड शून्य स्वप्नाची 
चौकट बाकी आहे 


- सोनाली गाढवे देशमुख. दि. १७ सप्टेंबर २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख


Friday 16 September 2016

मेहंदी

हाती तुझ्या मेंदितल्या नक्षीदार आठवांची गुंफण
मनाच्याही दारी बहारो स्वप्नमयी सुखांचे अंगण

- सोनाली गाढवे देशमुख. दि. २० एप्रिल २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख




तुझे हास्य


निखळ तुझे हास्य जणू चांदण्यांचा कवडसा ...
सोनपंखी ऊन्हा मागे ओसरता मेघ जसा …



- सोनाली गाढवे देशमुख. दि. २० एप्रिल २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख.

Thursday 15 September 2016

जिभ

कशाला गरज तुला चाकू सुऱ्यांची
शब्दांचेच आघात आता असह्य झाले

नको दाखवू गडगंज श्रीमंती तू जिभेजी
चालणारे बोलणारे माझे प्रेत झाले


- सोनाली गाढवे देशमुख. दि. १५ सप्टेंबर २०१६
© सोनाली गाढवे देशमुख

Tuesday 22 March 2016

पित्र

आई वडील  गेल्यावर त्यांना अचानक पित्र अशी नवीन उपमा देऊन त्यांचे फोटो घरात नसावेत असा समाज असणार्यां लोकांची कीव करावी वाटते

लाज वाटली पाहिजे राव मतलबी कुठले एकजात …. तो बामन दीड शहाणा अक्कल शिकवणारा आणि हे नंदी बैलच जणू …

त्यांनी कष्टानी मेहनतीनं पै पै गोळा करत रक्ताचं पाणी करून काय बामणाला विचारूनचं पोसलेलं का *** ह्यांना

त्यांआईवडिलांची मिळकत बँक बँलंस जमीन जुमला चालतो होय तुम्हाला तो नई आश्रमाला दान करा सांगत तुमचा so called बामन…


- सोनाली गाढवे देशमुख. दि. २२ मार्च २०१६ 
© सोनाली गाढवे देशमुख.